milk tanker accident at kumbharpada phata at nandurbar visarwadi road today  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News : नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर भीषण अपघात, कुंभारपाडा फाट्याजवळ वाहिली दूधाची गंगा

रस्त्यावर विखुरलेले दुधाचे कॅन स्थानिक नागरिकांनी आणि कुंभारपाडा येथील राजपाल गावित, युवराज गावित यांनी बाजूला केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

नंदुरबार विसरवाडी रस्त्यावरील कुंभारपाडा फाट्याजवळ आज (गुरुवार) सकाळी दूध वाहतूक करणा-या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दूध वाहतूक करणारे वाहन उलटल्याने रस्त्यावर दूधाची गंगा वाहिली. या अपघातामुळे कुंभारपाडा फाटा मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : एक दुध वाहतुक करणारे वाहन आज सकाळी विसरवाडी परिसरातून दूध संकलन करून गुजरात राज्यातील सुबीर येथे निघाले हाेते. विसरवाडी जवळील कुंभारपाडा फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला.

या वाहना मधील दुधाचे भरलेले कॅन रस्त्यावर पडले. यामुळे हजारो लिटर दूध रस्त्यावर सांडले. या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे. रस्त्यावर विखुरलेले दुधाचे कॅन स्थानिक नागरिकांनी आणि कुंभारपाडा येथील राजपाल गावित, युवराज गावित यांनी बाजूला केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघातग्रस्त वाहन चालकास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बुलडाण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

Kidney stone pain: सतत जाणवणारी कंबरदुखी असू शकते किडनी स्टोनचं लक्षणं; कसे केले जातात यावर उपचार?

भाजप आमदारांसोबत संगनमत अन् महिलांशी गैरवर्तणूक; शिवसेनेच्या नेत्यावर आरोप, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT