KOLHAPUR GOKUL MORCHA saam tv
महाराष्ट्र

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

KOLHAPUR GOKUL MORCHA POLICE DHAKKABUKKI: कोल्हापूरमध्ये दूध उत्पादक थेट गोकूळच्या कार्यालयात घुसले.मात्र दुध उत्पादक शेतकरी एवढे आक्रमक का झाले? त्याची कारणं काय आहेत? आणि या आंदोलनाचे कसे राजकीय पडसाद उमटलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

हा दूध उत्पादकांचा संताप आहे गोकूळ दुध संघाविरोधात.आणि त्याला कारण ठरलंय गोकूळ दुधसंघाने दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला 136 कोटींचा बोनस. मात्र त्यातून तब्बल 40 टक्के रक्कम डिबेंचरसाठी दुधसंघाने कापून घेतल्याने दूध उत्पादक आक्रमक झालेत...

खरंतर 2024-25 या आर्थिक वर्षात गोकुळ दूधसंघात 3670 कोटींची उलाढाल झाली तर 11 कोटींचा निव्वळ नफा झाला. त्यानंतर गोकूळ दुधसंघाने दुध दरातील फरक आणि बोनसपोटी जाहीर केलेल्या 136 कोटींपैकी 40 टक्के रक्कम कापण्यात आली.तर ऐन दिवाळीत ही रक्कम कापण्यात आल्यानं जवाब दो मोर्चा काढून दूध उत्पादक थेट गोकूळच्या कार्यालयात घुसले.. आणि इथंच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

मात्र दूध उत्पादकांकडून कापण्यात आलेलं हे डिबेंचर म्हणजे नेमकं काय असतं? पाहूयात...

डिबेंचर म्हणजे संस्थेचं कर्जपत्रं असतं. गोकूळनं प्लांटच्या उभारणी आणि विस्तारासाठी डिबेंचर जारी केलं. हे डिबेंचर सभासद आणि गुंतवणूकदार विकत घेत असतात. मात्र दूध संघानं त्यातून गुंतवणूक आणि व्याजापोटी 40 टक्के रक्कम कापून घेतलीय.. त्यामुळे दिवाळीत आर्थिक चणचण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आंदोलक आक्रमक झालेत.

खरंतर एकवेळ आमदारकी नको.पण गोकूळचं संचालकपद हवं.अशी कोल्हापूर जिल्ह्यातील वदंता.कारण गोकूळला दुभती गाय म्हटलं जातं.आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गोकूळचं प्रशासन विरुद्ध दूध उत्पादक संघर्षाची ठिणगी पडल्याने उकळलेल्या दुधाने कुणाचं तोंड भाजणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT