
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं सलग दुसऱ्या दिवशी निवडणुक आयोगाची भेट घेतली.त्यातच निवडणूक आयोगाच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. आयोगाचा सर्व्हर दुसरं कुणीतरी बाहेरून ऑपरेट करत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय.तर भाजपचे पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आयोगाची वेबसाईट हाताळतात, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय.
मात्र विरोधकांनी ज्या देवांग दवेंवर आरोप केलाय.... ते देवांग दवे नेमके कोण आहेत?... पाहूयात...
देवांग दवे कोण आहे?
देवांग दवे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक
राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख
वयाच्या 19 व्या वर्षी मोदींसाठी स्वयंसेवक म्हणून काम
दवेंनी आय सपोर्ट नरेंद्र मोदी डिजिटल मोहीम राबवली
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची जाहिरात मोहीम सांभाळली
जून 2025 मध्ये मुंबईतील कांदिवली पूर्वमधल्या जानुपाडा परिसरात देवांग दवे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांमधील वाद इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. ज्यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली होती.त्यातच आता विरोधकांनी देवांग दवेंवर निशाणा साधल्यानं पक्षश्रेष्ठी आणि निवडणुक आयोग विरोधकांच्या या आरोपाला काय उत्तर देत? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.