
हा धक्कादायक दावा ऐकून तुम्ही कॉफी पिणंच सोडून द्याल.कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय.इतकंच नव्हे तर भारतात 20 टक्केही झुरळाची पावडर टाकली जाते असा खळबळजनक दावा केलाय.हा दावा गंभीर आहे.
झुरळ दिसलं तरी काही लोक पळतात.तर काही जण झुरळाला मारून टाकतात.आणि झुरळाची पावडर कॉफीत टाकली जाते असा दावा केल्याने कॉफी पिणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.खरंच कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते का...? या दाव्यात तथ्य असू शकतं का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.कारण, देशभरात बरेच लोक कॉफी आवडीने पितात.त्यामुळे याची सत्यता समोर आणणं महत्त्वाचं आहे.आमच्या व्हायरल सत्य टीमने याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घेतला.
इन्स्टंट कॉफीमध्ये लहान अवशेष जास्त दिसू शकतात, कारण निर्मिती प्रक्रियेत हे अवशेष बारीक होऊन मिसळण्याची शक्यता असते...कोणतेही खाण्याचे प्रोडक्ट बाजारात येतं त्यावेळी FDA ची मान्यता घ्यावी लागते...त्यानंतरच पुढे हे प्रोडक्ट विक्रीला येतं.त्यामुळे कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.