Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mukesh Ambani Giving Free Gold On Diwali: दिवाळी ऑफर म्हणून अंबानी फ्री गोल्ड देतायत...होय, असा दावा करणारा व्हिडिओ आता समोर आलाय...पण, व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का...? अंबानी फ्री गोल्ड देणार आहेत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
mukesh ambani
mukesh ambanisaamtv
Published On

दावा करण्यात आलाय की, दिवाळी ऑफरमध्ये मुकेश अंबानींनी मोठी घोषणा केलीय...या ऑफरमध्ये सोन्याची चेन फ्री दिली जाणार आहे, आणि फ्री सोन्याची चेन हवी असल्यास 'बॉक्स ज्वेलरी' नावाच्या कमेंटमध्ये जाऊन येस करा आणि दिलेल्या लिंकवर जाऊन ऑर्डर करा...असा दावा केलाय.हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय...पण, खरंच फ्री सोनं देण्याची अंबानींनी घोषणा केलीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

मुकेश अंबानींच्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल होतोय.व्हिडिओत सोपी पद्धत सांगण्यात आलीय.त्यामुळे अनेकांनी इन्स्टाग्रामला जाऊन फॉलोही केलंय.मात्र, मोफत सोन्याची चेन कुणाला मिळाली नाही...त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे...? व्हिडिओमागचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

mukesh ambani
Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

अंबानींनी कोणतीही फ्री गोल्ड योजना घोषित केली नाही

व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

इन्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी खटाटोप

व्हिडिओसोबत दिलेली लिंक उघडून पाहू नका

लिंकच्या माध्यमातून तुमचा डेटाही चोरी होऊ शकतो

सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय...त्यामुळे लोकांना खोटी आमिषं दाखवून गंडा घालण्याचा हा प्रयत्न आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत दिवाळीत अंबानींकडून फ्री गोल्ड मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय...तुमच्या मोबाईलवर असा व्हिडिओ आल्यास फॉलो करू नका...तुमची फसवणूक होऊ शकते.

mukesh ambani
Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com