MHADA LOTTERY 2025: AFFORDABLE HOMES IN NASHIK AND SAMBHAJINAGAR STARTING AT ₹5 LAKH Saam tv
महाराष्ट्र

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

MHADA Lottery 2025: MHADA ची नवी संधी! नाशिक आणि संभाजीनगरमध्ये फक्त ₹५ लाखांपासून घर मिळवा. अर्ज करण्याची अंतिम तारीख – ११ ऑगस्ट २०२५.

Bhagyashree Kamble

आपल्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, महागाईच्या काळात अनेकांना घर घेणं परवडत नाही. अशावेळी म्हाडा आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हाडाच्या नव्या लॉटरी योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि नाशिककरांना सुवर्णसंधी आहे. ही योजना खास अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबियांसाठी खास डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बंपर लॉटरी काढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १३५१ घरे तयार करण्यात आली असून, नाशिक विभागात १४८५ घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या घरांचा लाभ अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना होणार असून, फक्त ५ लाख किमतीपासून घरे उपलब्ध केले जाणार आहेत.

नाशिकमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाकडून घरे उपलब्ध केले जाणार असून, त्या घरांची किंमत १२.६८ लाख ते १३.५५ असणार आहे. यासह म्हाडाकडून अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमधील अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यांची किंमत ११.९४ लाख ते १५.३१ लाख इतकी असणार आहे.

तसेच अहिल्यानगरमध्येही बंपर लॉटरी म्हाडाने काढली आहे. अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेदी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या घरांची किंमत फक्त ५.४८ लाख इतकी असणार आहे.

पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नक्षत्रवाडीमध्ये १०५६ घरे असून, त्याची किंमत १५.३० लाख रूपये इतकी असणार आहे. चिखलठाणामध्ये १५८ घरे असून, त्याची किंमत २७ लाख रूपये इतकी आहे. तर, देवळाईत १४ घरे असून, त्याची किंमत ही १३.१९ लाख ते १६.१९ लाख इतकी आहे.

यासह आनंदपार्कमध्ये १८ घरे आहेत, त्याची किंमत ४.८७ ते ६.२७ लाख इतकी आहे. तर, चिखलठाणा येथील ६ घरांची किंमत ३४ लाख इतकी असणार आहे. बीडमधील अंबाजोगाईमध्ये ९२ घरे असून, त्याची किंमत १०.६५ लाख रूपये इतकी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?

म्हाडाच्या घरांच्या अर्ज प्रक्रियेची सुरूवात ३० जूनला होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. पैशांची मुदत १२ ऑगस्टपर्यंत आहे. यानंतर १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ ऑगस्ट रोजी अंतिम पात्र यादी जारी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT