Walmik Karad: 5 स्टार हॉटेलमध्ये वाल्मिक कराडसोबत 'ती'महिला कोण? जुन्या सहकाऱ्यानं व्हायरल केला फोटो

Vijaysingh Bangar shares walmik karad photo: संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा; आरोपी वाल्मिक कराडचा एका महिलेसोबतचा फोटो व्हायरल. विजयसिंह बाळा बांगर यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट उघड.
VALMIK KARAD’S HOTEL PHOTO AND AUDIO CLIP SPARK CONTROVERSY
VALMIK KARAD’S HOTEL PHOTO AND AUDIO CLIP SPARK CONTROVERSYSaam TV News
Published On

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा मुख्य सु्त्रधार वाल्मिक कराड तुरूंगात आहे. तुरूंगात असतानाही त्याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. विजयसिंह बांगर यांनी यापूर्वी वाल्मिक कराडचा एका आर्थिक व्यवहारातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केला होता. या कॉलमध्ये कराड संबंधित व्यक्तीला शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं स्पष्ट झालं.

आता बाळा बांगर यांनी कराडचा आणखी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आणला. कराडचा पंचतारांकिंत हॉटेलमधील महिलेसोबत असलेला फोटो व्हायरल केला. या फोटोमुळे खळबळ उडाली आहे.

बांगर यांनी, वाल्मिक कराडने खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला होता, असे सांगितले. वाल्मिक कराडने बांगर यांना अडकवण्यासाठी मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेला बोलावून घेतलं. तसेच कट रचला. त्यांनी पुढे सांगितले की, "वाल्मिक कराडने मला धमकी दिली होती. तुझ्याकडे असलेल्या सर्व संस्था आमच्या नावे करून टाक, अन्यथा तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेन", अशी माहिती बांगर यांनी दिली.

VALMIK KARAD’S HOTEL PHOTO AND AUDIO CLIP SPARK CONTROVERSY
Raj Thackeray: 'अरे ये!! माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोस' राज ठाकरे नेमकं कुणाला म्हणाले? ट्रेलर लाँचमध्ये काय घडलं?

त्याचप्रमाणे, संबंधित महिलेनेही "वाल्मिकचं ऐकलं नाहीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन" अशी थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बांगर म्हणाले, "वाल्मिक कराड आजवर अनेक महिलांना पुढे करून खोट्या प्रकरणांमध्ये लोकांना अडकवत आला आहे. मलाही त्याच पद्धतीने अडकवण्याचा प्लान कराड रचत होता", असं बांगर म्हणाले.

VALMIK KARAD’S HOTEL PHOTO AND AUDIO CLIP SPARK CONTROVERSY
Shocking: 'रक्त वाहू लागलं, ४० मिनिटे शोषण' तरूण नेत्यानं कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अब्रूचे लचके तोडले; परिसरात खळबळ

१० लाखांच्या व्यवहारावरून शिवीगाळ

बांगर यांनी वाल्मिक कराडचा एक ऑडिओ क्लिपही व्हायरल केला होता. बीडमधील एका व्यक्तीने वाल्मिक कराडला १० लाख रूपये दिले होते. नंतर वाल्मिक कराडने ते पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. वारंवार फोन करूनही कराड टाळत होता. संतापून कराडने त्या व्यक्तीला शिवीगाळ केली. तसेच पैसे देण्यास नकार दिला. याची माहिती बांगर यांनी दिली. हा ऑडिओ त्यांनी माध्यमांसमोर आणत पोलिसांनाही सुपूर्द करण्याचा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com