नाशिकमध्ये 'माय-लेकाच्या' नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जी आई नऊ महिने गर्भात मूल वाढवते, प्रसूतीच्या वेदना सहन करून त्याला जन्म देते आणि लहानपणापासून मोठं होईपर्यंत त्याचा सांभाळ करते. मात्र नाशिक शहरात आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. ज्या आईना जन्म दिला त्याच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिकरोड भागात मनोरुग्ण 57 वर्षाच्या नराधमाने अंथरूणाला खिळलेल्या 85 वर्षीय आईचा गळा आवळून निर्घृणपणे खून केला. नाशिकरोड येथील जेलरोड भागातील भगव चौकात असलेल्या अष्टविनायकनगर येथे राहणाऱ्या यशोदाबाई मुरलीधर पाटील (85) मंगळवारी रात्री घरी झोपलेल्या होत्या.
आजारी असल्याने ते तशाही अंथरूणातच होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मनोरुग्ण मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील हा राहत होता. तो विवाहित होता. मात्र त्याला मानसिक आजार असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली. यामुळे घरात आई आणि मुलगा हे दोघेच राहत होते.
याच नराधम अरविंदने त्याच्या हाताने आपल्या आईचा गळा आवळून रात्री खून केला. यानंतर स्वतः नाशिकरोड पोलिस ठाणे येथे हजर होऊन आपल्या गुन्ह्यांची कबुली देत अंथरूणात असलेल्या आईच्या वृद्धपळकाला कंटाळून तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. याचे बोलणे ऐकून पोलिसांनीही सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही.
नाशिकरोड पोलिसांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेत त्याला पोलिस वाहनात बसवून घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घरात पाहणी केली असता पलंगाव यशोदाबाई या मृत अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या मनोरुग्ण विरोधात गुन्हा दाखल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.