Sant Tukaram Maharaj Palkhi Saam tv
महाराष्ट्र

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबारायांच्या पालखीला यंदा चेन्नईहून मागविली छत्री; लोखंडाऐवजी बांबूच्या चिमट्यांचा वापर

दिलीप कांबळे

मावळ : आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या प्रमुख पालख्यांपैकी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. पालखी सोहळ्याचे यंदा  ३३९ वे वर्ष असून पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने यंदा नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी खास हि छत्री चेन्नई येथून बनविण्यात आली आहे. छत्रीवरील आकर्षक अशा हस्तकला, पितळी कलश व लोखंडाऐवजी बांबूच्या चिमट्यांचा वापर करण्यात आला आहे. 

संत तुकाराम महाराज संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतली आहे. ही छत्री श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष (Ashadhi Wari) कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखी सोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे लक्षवेधी ठरणार आहे. 

छत्रीवर सुरेख नक्षीकाम 

छत्री रंगीत व आगळी वेगळी सुरेख पद्धतीने तयार केलेली असून अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका यांच्या समवेत भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हस्तकलेने केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केले आहे. छत्रीसाठी लागणाऱ्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. लोखंडी तारा बसविलेल्या नाही. छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीचे एसएस लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे. छत्रीच्या वर पितळी कळस बसविण्यात आला असल्याची माहिती संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT