Maval News Saam TV
महाराष्ट्र

Maval News : मद्यपींचा नागरिकांना नाहक त्रास; मनसे स्टाईलने वडगावमधील ताडी दुकान केले उद्ध्वस्त

Tadi Shops Destroyed : ताडी विक्रीचे दुकान प्रशासकीय कारवाईची वाट न पाहता माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी थेट मनसे स्टाईलने जेसीबीच्या सहाय्याने उद्धस्त केलेय.

साम टिव्ही ब्युरो

दिलीप कांबळे, मावळ

मावळच्या वडगाव शहरात गेली अनेक वर्षे सुरू असलेले ताडी विक्रीचे दुकान प्रशासकीय कारवाईची वाट न पाहता माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी थेट मनसे स्टाईलने जेसीबीच्या सहाय्याने उद्धस्त केलेय. पेशवेकालीन तळ्याजवळ गेली अनेक वर्षे एका पत्र्याच्या शेडमध्ये ताडी विक्रीचा धंदा अविधरित्या सुरू होता.

याच आवारात दर गुरुवारी आठवडे बाजार असल्यामुळे या ठिकाणी ताडी दुकान असल्याने मद्यधुंद अवस्थेत वावरत असणाऱ्या मद्यपींचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे संबंधित धंदा तात्काळ बंद करावा, तसेच दुकान मालकाचा परवाना बंद करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.

दरम्यान, संबंधित ताडी विक्री दुकानाच्या परवान्याबाबत म्हाळसकर यांनी चौकशी केली असता नगरपंचायत प्रशासनाने संबंधित दुकानात ना हरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी किंवा कोणतीही नोंद नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला परवाना सन २०२२ मध्येच संपुष्टात आला असल्याचे निदर्शनास आले होते.

अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

लोकसभेची आचारसंहिता लागल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी करत कारवाई केली जात आहे. धुळ्यातही गेल्या आठवड्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत सोळा गुन्हे दाखल केले. तसेच गावठी हातभट्टीची दारू व कच्चे रसायन असा साधारण तीन लाख ६० हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करून कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT