Goa Crime News: कारमध्ये झोपला अन् होत्याचं नव्हतं झालं; सोलापूर जिल्ह्यातील २८ वर्षीय पर्यटकाचा गोव्यात मृत्यू

Kalangut News: गोव्यातील कळंगुट येथे एकहृदयद्रावक घटना उघडकीस आलीये. पर्यटनासांठी आलेल्या एका २८ वर्षीय तरुण मद्यपान करुन रात्रभर गाडीतच झोपला.
Goa Crime
Goa CrimeSaam Digital

गोव्यातील कळंगुट येथे एकहृदयद्रावक घटना उघडकीस आलीये. पर्यटनासांठी आलेल्या एका २८ वर्षीय तरुण मद्यपान करुन रात्रभर गाडीतच झोपला. दुसऱ्या दिवशी कारचे दरवाजे उघडले असता त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कळंगुट पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत.

Goa Crime
Crime News : बीडसह मावळमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई, लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय सोनी शिंदे असे मृत पर्यटकाचे नाव आहे. सोनी हा त्याच्या काही मित्रासमवेत पर्यटनासाठी गोव्यात आले होते,ज्या मित्रांमध्ये सिद्धेश्वर माद्रे आणि अक्कलकोट येथे राहणारे इतर असे अजून दोन मित्र होते. हे चौघेजण कारमधून गोव्याला पर्यटनासाठी गेले होते.

शुक्रवार १२ एप्रिल रोजी चौघेजण कळंगुट येथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी १३ एप्रिलच्या रात्री ते जेवणासाठी बाहेर गेले. तिथे ते दारू प्यायले होते. सोनी शिंदे याने सुद्धा मद्यपान केले . त्याचे मित्र त्याला झोपण्यासाठी खोलीत घेऊन जात होते , पण त्याने नकार दिला. मी कारमध्येच झोपतो असं तो मित्रांना म्हणाला आणि सोनी कारमध्येच झोपला. सोनी कारममध्ये झोपल्याने सिद्धेश्वरने कारचे सर्व दरवाजे बंद केले आणि ते सर्वजण रुमवर जाऊन झोपले

दरम्यान या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोनी दुपारपर्यंत कारमध्येच झोपलेला होता. दुपार झाल्याने मित्रांनी परत येऊन गाडीचे दरवाजे उघडले असता सोनी बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यामुळे तातडीने सोनीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रात्रभर बंद कारमध्ये असल्याने गुदमरुन त्यातच सोनीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असावा,असा अंदाज शवविच्छेदन अहवालातून व्यक्त करण्यात आलाय. या घटने प्रकरणी पोलिसांनी सोनी याचा मित्र संशयित सिद्धेश माद्रेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सुरु करण्यात आलेला आहे.

Goa Crime
Nashik Crime News : ६ लाख ६४ हजार किमतीचा गुटखा जप्त, नाशकातील एकास घेतलं पाेलिसांनी ताब्यात; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com