Pune District Bank Saam tv
महाराष्ट्र

Pune District Bank : भात पिकावर करपा रोगाचे सावट; पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दिलासा, सरसकट दहा हजाराचे कर्ज

Maval News : भात पिकावर पडत असलेल्या करपा रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यावर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय पुणे जिल्हा बँकेने घेतला आहे.

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकावर करपा, तांबेरा व तुळतुळा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना सरसकट १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. 

राज्यात यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने हाहाकार माजविला आहे. अर्थात गेल्या १० मेपासून तालुक्यात सलग पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका भात लागवडीला बसला आहे. यंदा मावळ तालुक्यात सुमारे अकरा हजार हेक्टरवर भात लागवड झाली असली तरी पावसाच्या अतिरेकामुळे पीक नीट उभे राहिले नाही. यात आता रोगराई पडण्यास सुरवात झाली आहे. 

शेतकऱ्यांना मिळणार सरसकट १० हजार 
या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या फवारणीविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेतला आहे. भात लागवडीसाठी पूर्वी किती कर्ज घेतले आहे; अथवा कोणत्या बँकेचे कर्ज आहे. याचा विचार न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. हे कर्ज प्रामुख्याने कीटकनाशक फवारणीसाठी उपयोगात आणता येणार आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष माऊली दाभाडे म्हणाले की, भात पिकावर रोगांचा प्रादुर्भाव गंभीर असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने विशेष योजना राबवून शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ही मदत हातभार ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro : आता मेट्रोत रिल्स, व्हिडिओ कराल तर कारवाई होणार, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: माढामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

Dharashiv flood crisis : शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं, धाराशिवकर आक्रमक | VIDEO

Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

छगन भुजबळांचा कौतुकास्पद निर्णय, शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

SCROLL FOR NEXT