Beed Rain : धक्कादायक! १० वर्षाचा चिमुकला पुराच्या पाण्यात गेला वाहून; कुटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबेना

Beed Flooding News: बीड जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत असल्याने अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. अशात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात दहा वर्षीय चिमुकला वाहून गेल्याने गावात खळबळ उडाली आहे.
Beed Rain
Beed RainSaam tv
Published On

योगेश काशिद
बीड
: बीड जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे आतोनात नुकसान झाले असून अनेकांचा जीव देखील गेला आहे. दरम्यान बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि धुवाधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना पुराच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची धक्कादायक घटना पिंपळवाडी येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबावर मोठा आघात पोहचला असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. 

बीड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. साधारण आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतीतील पिकांसह अन्य वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात आजही पूरस्थिती कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाल्याने आलेल्या पुरात एक दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. 

Beed Rain
Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

डोळ्यातील अश्रू थांबेनात 

आदित्य कळसाने (वय १०) असे पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने पिंपळवाडी गावावर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीय आज ढसाढसा रडत आहे. आमचे सर्वस्व गेलं आहे; आता मदत मागून तरी काय उपयोग. मात्र काहीतरी दिलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे सर्व सांगताना आदित्यच्या आई- वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. 

Beed Rain
Sambhajinagar Rain : अनेक वर्षांतील पावसाचे विक्रम मोडीत; संभाजीनगरात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस

पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७५ लोकांना सुखरूप काढले बाहेर 

बीडच्या सिंधफना नदीकाठच्या कुर्ला गावात दोन वस्त्यांमध्ये ७५ लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिक अडकले होते. यांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले असून संपूर्ण नागरिक पुराच्या पाण्यातून बाहेर येईपर्यंत गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित हे त्या ठिकाणी तळ ठोकून होते. ज्यावेळेस शेवटचा व्यक्ती बाहेर आला त्याच वेळेस ते तिथून हल्ले सर्व लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी सूचना देखील दिले आणि विचारपूस देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com