Sambhajinagar Rain : अनेक वर्षांतील पावसाचे विक्रम मोडीत; संभाजीनगरात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस

sambhajinagar News : सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जात आहे
Sambhajinagar Rain
Sambhajinagar RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील आठवडाभरापासून पावसाने झोडपून काढले आहे. या सततच्या पावसामुळे यंदाच्या पावसाने अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याचे जिल्ह्यातील जुने जाणकार सांगत आहेत. अजूनही काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे कन्नड, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यातील अनेक शिवार पाण्यात आहेत. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ सह परिसरातील कसाबखेडा, मंबापुर, पळसवाडी, तलाववाडी, शादुलवाडी, शेकापुरी, तिसगाव, निरगुडी, पिंपरी, पळसगाव, आखातवाडा शिवारातील पिके धोक्यात आले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात वित्त हानी देखील झाली. 

Sambhajinagar Rain
Ambarnath Police : अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

शेतकरी आर्थिक अडचणीत 

सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मका, सोयाबीन, कापूस आदी पिकांनी माना टाकल्या आहेत. पाने पिवळी पडत असून करपा, अळी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Sambhajinagar Rain
Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

नुकसान भरपाईची मागणी 
आधीच कर्जबाजारी असून शेतात सोयाबीन आणि मका पेरली आहे. या पिकाच्या भरोशावर कर्ज काढले होते. आता मका व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यात रानडुकरांचा देखील त्रास वाढला आहे. अनेक ठिकाणी मका रानडुकराने तुडवली आहे. नुकसान भरपाई सरकारने द्यावी; अशी मागणी पळसवाडी येतील शेतकरी कारभारी औटे यांनी केली आहे. तर अतिवृष्टीमुळे येणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे. मक्का- सोयाबीन पीकही हातचे गेले आहे. यामुळे माझे आर्थिक गणित कोलमडले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे वेरूळ येथील शेतकरी आप्पासाहेब विष्णू वेताळ यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com