Terrace Farming Saam tv
महाराष्ट्र

Terrace Farming : सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर फुलविली शेती; तळेगावातील उच्चशिक्षित महिलेचा प्रयोग

Maval Talegaon News : शेती नसली तरी घराच्या टेरेसवर शेती करून त्याची योग्य ती निगा राखून घरात पुरेल असा भाजीपाला व फुलांची शेती करण्याचा प्रयोग तळेगाव दाभाडे येथील महिला यशस्वीपणे करत आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : वाढत्या नागरीकरणामुळे आणि काँक्रीटच्या जंगलामुळे शहरातील हिरवाई कमी होत चाललेली आहे. यामूळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर शरीराला शुद्ध हवा आणि सेंद्रिय पद्धतीचे भाज्या मिळणे कठीण झाले आहे. मात्र मावळच्या तळेगाव दाभाडे येथील एका उच्चशिक्षित महिलेने स्वतःच्या इमारतीवर टेरेस गार्डन फुलवले असून त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

मूळच्या पुणे जिल्ह्यातील खेड गावच्या असलेल्या सुजाता महिले यांच्या आई- वडिलांकडे सात एकर बागायती शेती आहे. सुजाताताई या आईसोबत लहानपणी रोज शेतात जाऊन शेतीचे काम करीत असत. मात्र लग्न झाल्यानंतर त्या तळेगावमध्ये स्थायिक झाल्या. मनातील शेती करण्याची इच्छा तशीच राहिली. मात्र शेतीत फळभाज्या आणि झाडांची अतिशय आवड असल्याने टेरेस गार्डनच्या माध्यमातून त्यांनी हा छंद जोपासला आहे. 

पाच वर्षांपासून फुलवताय टेरेस गार्डन 

मावळतील तळेगाव दाभाडे येथे त्यांची तीन गुंठे जागेत सदनिका आहे. या सदनिकेच्या टेरेसवर त्यांनी अतिशय मनोहारी शेती फुलवलीय आहे. सुजाताताई यांनी गेल्या पाच वर्षापासून कष्ट करून टेरेस गार्डन फुलवल आहे. या टेरेस गार्डनमध्ये आंब्याची पाच प्रकारची झाडे आहे. त्याचप्रमाणे चिकू, अंजीर, रामफळ, पालक मेथी, भेंडी, गवार, वांगी, कोबी, मुळा, कोथिंबीर, चिली टमाटर, कांदा, बटाटा, रताळी फुलकोबी, पानकोबी तर मोगरा, चाफा, जास्वंद, गुलाब, शेवंती, निशिगंधा अशा विविध भाज्या फुलझाडे लाऊन यांची गार्डन कम शेती फुलवली आहे. 

घरी आलेल्या पाहुण्यांनाही देतात भेट 

बाजारातून आणलेल्या भाज्या दोन ते तीन दिवसात खराब होतात. मात्र आपल्या घरी सेंद्रिय पद्धतीने टेरेसवरती छोटसं गार्डन केलं तरीही पौष्टिक भाज्या मिळू शकतात. दरम्यान आपल्या घरी आलेल्या पै पाहुण्यांना सेंद्रिय पद्धतीने केलेल्या गार्डन मधील भाज्या द्यायला त्या विसरत नाही. आपल्या घरी भाज्या झाडांची पाने कोमेजलेली फुले हे सर्व एका ड्रममध्ये टाकून कुजून त्याचे खतही तयार करून फळभाज्यांना देतात. तर कढीपत्त्याचा अर्क काढून तोही भाज्यांना फुलांच्या झाडांना देतात.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT