Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Akola News : भुमिहीन शेतमजूर असुन त्यांनी उदारनिर्वाहासाठी बकऱ्या पाळल्या होत्या. एक बकरी नदीच्या काठावरुन खाली कोसळली असता बकरी पाण्यात पडलेली बघुन बकरीला वाचवण्यासाठी नदी पात्रात उतरले
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना नदीत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बकरी पडली असता तिला बाहेर निघता येत नव्हते. यामुळे नदीच्या साचलेल्या पाण्यात बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी पाण्यात सदर व्यक्ती उतरला. या व्यक्तीने बकरीला वाचविले मात्र पाण्यात बुडुन त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यात घडली आहे. या घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या गाडेगांव येथील आस नदीच्या पात्रात सदरची घटना घडली आहे. संजय सदाशिव वानखडे असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय सदाशिव वानखडे हे भुमिहीन शेतमजूर असुन त्यांनी आपल्या उदारनिर्वाहासाठी काही बकऱ्या पाळल्या होत्या. या बकऱ्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर संजय वानखडे हे घरखर्च भागवत होते. 

Akola News
Mumbai Accident: मुंबईत भरधाव बेस्ट बसची कारला धडक, चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू; भयंकर VIDEO

बकरीला वाचविले पण.. 

दरम्यान बकऱ्यांना चारण्यासाठी ते गाडेगाव येथील आस नदीच्या काठावर गेले होते. यावेळी एक बकरी चरत असतांना नदीच्या काठावरुन पाय घसरल्याने बकरी नदी पात्रात पडली. डोळ्यादेखत आपली बकरी पाण्यात पडलेली बघुन बकरीला वाचवण्यासाठी संजय वानखडे हे नदीच्या पात्रात गेले. अशातच त्यांनी बकरी तर वाचवली. परंतु दुर्दैवाने बकरी वाचवतांना पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यू झाला. 

Akola News
शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बड्या नेत्याचा राजीनामा

कुटुंबीयांचा आक्रोश 

सदर घटनेची माहिती गावात वार्यासारखी पसरल्याने समस्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याच वेळी गावातील परमेश्वर इंगळे यांनी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनावणे यांना घटनेची माहिती दिली. यानंतर तेल्हारा तहसीलदाराने प्रशासनाला कामी लावले आणि तेल्हारा तालुक्यातील आडसुळ येथील बचावकार्य करणाऱ्या पथकास पाचारण करुन घटनास्थळी दाखल केली. पथकाने संजय वानखडे यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com