Eknath Shinde
Maharashtra Politics Saam Tv

शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बड्या नेत्याचा राजीनामा

Political Storm in Ahilyanagar: शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. बाजीराव दराडे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली. मारुती मेंगाळ यांच्या प्रवेशानंतर वाद विकोपाला गेला.
Published on
Summary
  • शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला

  • बाजीराव दराडे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली

  • मारुती मेंगाळ यांच्या प्रवेशानंतर वाद विकोपाला गेला

  • एकनाथ शिंदे यांनी मेंगाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अहिल्यानगरात वादाची ठिणगी पडली असून, शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकोले दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला, ज्यामुळे गटातील मतभेद उघड झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे अकोले दौऱ्यावर होते. अकोले दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

Eknath Shinde
ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री.. ठाण्यातील नेत्याला सोडणार नाही.. ठाकरे गटाचे नेते आक्रमक

मारूती मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशानंतर दराडे आणि मेंगाळ यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. मेंगाळ यांनी पक्ष प्रवेशावेळी बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दराडे यांनी केला होता. मात्र, अकोले येथे आयोजित आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी, मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, पक्षांतर्गत वादामुळे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे हे नाराज झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करण्यासाठी निर्णय घेतला. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट राजीनामा पाठवला. दराडे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांच्यातील उघड नाराजी दिसून आली.

Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला बिझनेस; एकनाथ शिंदेंही इम्प्रेस; किती होते कमाई?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com