लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला बिझनेस; एकनाथ शिंदेंही इम्प्रेस; किती होते कमाई?

Eknath Shinde Praises Woman Entrepreneur: लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती, योजना अविरत सुरू. ठाण्यात योगिता खेवटकर यांनी निधीतून फूड स्टॉल सुरू केला. एकनाथ शिंदेंनी महिला उद्योजिकेचं कौतुक केलं.
Eknath Shinde Praises Woman Entrepreneur
Eknath Shinde Praises Woman EntrepreneurSaam Tv News
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती, योजना अविरत सुरू.

  • ठाण्यात योगिता खेवटकर यांनी निधीतून फूड स्टॉल सुरू केला.

  • एकनाथ शिंदेंनी महिला उद्योजिकेचं कौतुक केलं.

  • योजनेतून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळालं.

महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे भक्कम पाठिंबा मिळाला होता. या योजनेला वर्षपूर्ती झाली असून, ही योजना अजूनही अविरत सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांना आर्थिक पाठबळ मिळालं. या योजनेतून मिळत असलेल्या निधीतून अनेकांनी व्यवसाय देखील सुरू केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाच एका लाडक्या बहिणीच्या फुड स्टॉलला भेट दिली. महिलेला सरकारकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी फूड स्टॉलला सुरू केलाय. एकनाथ शिंदे यांनी बिझनेस वुमनचं कौतुक केलं आहे.

ठाण्यात योगिता खेवटकर या महिलेनं लाडकी बहीण योजनेतून मिळत असलेल्या निधीतून फुड स्टॉल उभारलं. त्यांचं एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं आहे. 'आज लाडकी बहीण फूड कॉर्नर मी बघितलं. या योजनेच्या माध्यमातून या ताईंनी लाडकी बहीण फूड कॉर्नर उभारलं. अनेक लाडक्या बहिणींनी अशा प्रकारे व्यवसाय उभारले. फूड स्टॉल उभारल्यामुळे कुटुंबाला आधार मिळतोय. लाडक्या बहिणींचे सक्सेस स्टोरी खूप आहे.'

Eknath Shinde Praises Woman Entrepreneur
अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

'लाडक्या बहिणींना सक्षम करणं हाच महायुतीचा उद्देश आहे. या योजनेचा पुरेपूर योग्य वापर लाडक्या बहिणींनी केला आहे. त्याचा मला खूप आनंद आहे', असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'या फुल स्टॉलवर संपूर्ण कुटुंब काम करत आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणार बना आणि ते काम ताईंनी केलंय.

80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा मूलमंत्र आहे. हे पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. विरोधकांनी इथे येऊन चहा प्यावा, नाश्ता करावा', असा खोचक टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Eknath Shinde Praises Woman Entrepreneur
कामाची भूलथाप, तृतीयपंथीयासह तिघांकडून आळीपाळीनं बलात्कार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com