Online Game Saam tv
महाराष्ट्र

Maval News : ऑनलाइन गेममध्‍ये वीस हजार रूपये हरला; घरचे रागावतील या भितीने उचलले टोकाचे पाऊल

ऑनलाइन गेममध्‍ये वीस हजार रूपये हरला; घरचे रागावतील या भितीने उचलले टोकाचे पाऊल

दिलीप कांबळे

मावळ : ऑनलाईन गेमिंगमधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुणांचे नुकसान होत आहे. यातूनच एका तरुणाने आत्महत्या केली. (Maval) मावळच्या तळेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गणेश काळदंते असं त्याचं नाव होतं. (Maharashtra News)

मावळच्‍या तळेगावात वास्‍तव्‍यास असलेला गणेश काळदंते यास मोबाईलवरील जंगली रमी खेळायची सवय लागली होती. या ऑनलाईन रमीमध्ये तो वीस हजार रुपये हरला. गणेश हा कार चालक असून त्याला व्यसनही होते. त्यातच तो मोबाईलवर रमी खेळत असे. कमावलेले बहुतांश पैसे तो यातच उडवत असायचा. कुटूंबियांनी त्‍याला अनेकदा यापासून दूर ठेवायचा प्रयत्‍न देखील केला. परंतु, सवय लागल्‍याने तो सतत ऑनलाइन गेम खेळत होता.

कुटूंबिय ओरडतील म्‍हणून गळफास

विवाहित असलेला गणेश असा वाया गेल्याचं दिसून यायचं त्यामुळं कुटुंबीय त्याच्यावर अनेकदा ओरडायचे. अशातच तो रमी मध्ये (Online Game) वीस हजार रुपये हरला. यामुळे आता तर घरचे चांगलेच भडकणार. याच टेन्शनमध्ये त्याने रविवारच्या सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती कुटुंबीयांनी तळेगाव पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा गोंधळ संपता संपेना! नागपुरच्या विद्यार्थ्याला दिलं 'अबू धाबी'चं केंद्र

Maharashtra News Live Update: शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा...

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसे आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

धुळे हादरलं! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; थरारक व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT