Maval News Jungle Safari Saam tv
महाराष्ट्र

Maval News: जंगल सफारी बेतली जीवावर; घराकडे येताना चार विद्यार्थी वाट चुकले

जंगल सफारी बेतली जीवावर; घराकडे येताना चार विद्यार्थी वाट चुकले

दिलीप कांबळे

मावळ : पावसाळा आला की वेध लागतात ते मावळात भटकंतीचे. कारण मावळातील निसर्ग बहरतो. पुण्याच्या (Pune) सिंहगड इन्स्टिट्यूट या कॉलेजच्या मुलांनी बंक मारून पुण्यावरून थेट मावळ गाठलं. तालुक्यातील ढाक बहीरी या घनघाट अरण्यातील (Maval) सुळक्यावर जाण्याचा बेत आखला. मजल दरमजल करत या जंगलात शिरली. मात्र सायंकाळी घराकडे येताना वाट चुकली. या मुलांची वाटबिकट झाली कारण येथे नेटवर्क नसल्याने गुगल मॅपद्वारे ही मार्ग सापडत नव्हता. (Live marathi News)

घाबरलेल्या अवस्थेत अनेकांना मदतीसाठी कॉल केले. परंतु रात्री लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कु टीमला या चार मुलांची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्कु टीम यांनी आपदा मित्र मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि कामशेत पोलिसांचा चमू व स्थनिक ग्रामस्थांच्या मदतीने गर्द किर्रर्रर अंधारात दगड धोंडे तुडवत सलग चार तासाच्या अथक परिश्रमानंतर शोध मोहिमेत या मुलांनपर्यंत पोहोचले. मात्र शोध कार्यात पाऊस, धुके यांची अडचण मोठी होती. तर लोकेशन (jungle Safari) मिळत नसल्याने त्याचा त्रास रेस्कु टीमला झाला.

परंतु शोध पथक मुलांच्याजवळ पोहोचत नव्हते तोपर्यत या हरवलेल्या मुलांचा जीव टांगणीला लागला होता. मुसळधार पाऊस हिंस्त्रप्राण्यांचे भयानक आवाज आणि साप विंचवाची भीती या परिस्थितीत जंगलातील हा थरार मुलांचा अखेर संपला. मात्र या विद्यार्थ्यांना चांगलाच धडा शिकविला निसर्गाने, कॉलेजला दांडी मारून निसर्गाचा सैर सपाटा जीवावर बेतला असता कॉलेज कुमारांच्या हेच अघोरेखीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT