Pimpri Chinchwad Police Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Maval News : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन तोडीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या घटनांचा तपास केला जात असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा तपास लावत त्याला ताब्यात घेण्यात आले

दिलीप कांबळे

मावळ : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीचा तपास करताना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. फिल्मी स्टाईलने या चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून एकूण ६ लाख ५३ हजार १५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीकडून नऊ गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव दाभाडे, चिखली, बाणेर, चतुर्श्रृंगी व शिक्रापूर या परिसरात मागील काही दिवसांपासून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून चोरटे पसार होत होते. त्यांचा शोध सुरु असताना गौरव अनिल सरोदे (वय २४, रा. चाकण परिसर) याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार चैन स्नॅचिंग, चार घरफोड्या आणि एक मोटारसायकल असा एकूण नऊ गुन्ह्यांचा छडा उघड केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा
रावेत व चिखली परिसरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटल्याच्या गुन्ह्यांचा तपास करताना खाजगी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. रावेत येथे लाल हुडी आणि चिखली येथे निळी हुडी परिधान करून गुन्हे करणारा एकच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पुढील तपासात आरोपी हा चाकण परिसरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले.

१५  किलोमीटरचा पाठलाग
दरम्यान मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीस पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला असता पोलिसांनी पंधरा किलोमीटर फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला अखेर ताब्यात घेतले. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT