दिलीप कांबळे
मावळ : चोरीचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबिला आहे. यात मध्यरात्री कामावरून परतणाऱ्या कामगाराला तिघांनी रस्त्यात गाठत मारहाण केली. यानंतर फोन पे वरून रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली होती. दरम्यान बँकिंग आणि तांत्रिक विश्लेषणद्वारे फोन पे वरील डीपीच्या आधारे छडा लावून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.
चाकण वरून वराळे येथील घरी जात असताना नागनाथ दिनकर मुंडे यांची इंदोरी बायपास येथे तिघांनी अडवणूक केली. यानंतर नागनाथ यांना बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे कोटेश्वर वाडी ते माळवाडी मार्गावर त्यांनी दुचाकी उभी करून दोन हजार रुपये ऑनलाईन पाठवून द्या; असे सांगितले. यावेळी नागनाथ यांनी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांकडून शोधासाठी दोन पथक
इतकेच नाही तर दगडाने मारण्याची भीती दाखवली. यानंतर त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पासवर्ड विचारत नागनाथ यांच्या खात्यातून दहा हजार रुपये आरोपींनी आपल्या खात्यात ट्रान्सफर करून तिथून तिघांनी पळ काढला होता. या घडल्या प्रकरणानंतर नागनाथ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मारेकरींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दोन पथके नेमली.
खेड येथून एकाला घेतले ताब्यात
पोलिसांनी बँकिंग आणि तांत्रिक विश्लेषण करून मारेकरींचे लोकेशन शोधले. तसेच फोन पे वरून दहा हजार रुपये ज्या खात्यावर पाठवले. त्याच्या डीपी प्रोफाइल फोटोवरून खेड तालुक्यात सेलू येथे पोहोचले. यानंतर आरोपी पंकज जाधव (वय २०) याला अटक करण्यात आली. वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.