Bhiwandi Fire News Saam TV
महाराष्ट्र

Bhiwandi Fire News: भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; अनेक वाहने जळून खाक, परिसरात धुराचे लोट

Bhiwandi News: भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (ता. १९) रात्री १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही भिवंडी

Bhiwandi Latest News

भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (ता. १९) रात्री १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण गोदामाला विळखा घातला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत एक कंटेनर, एक छोटा टेम्पो आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय गोदामातील भंगार जळाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. (Breaking Marathi News)

भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यावरील वळ ग्रामपंचायत हद्दीत एक भंगाराचे गोदाम आहे. मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण गोदामाला विळखा घातला.

आग इतकी भीषण होती, परिसरात धुराचे लोट दिसून येत होते. दरम्यान, या आगीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना विळखा घातला. यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या काळात नारपोली पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक थांवून ठेवली होती. गोदामात साठवून ठेवलेलं ज्वालाग्राही साहित्य हे आगीचे कारण बनत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात आजपासून पाणी पुरवठ्यात 15 टक्के पाणी कपात

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT