Yawal News : धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू; म्हैशीला बाहेर काढताना गेला तोल

Jalgaon News : मोर नदीच्या पात्राजवळ गुरे चराईसाठी गेला होता. मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरकडे एक म्हैस गेली.
Yawal News
Yawal NewsSaam tv
Published On

यावल (जळगाव) : नदीत गेलेल्या म्हैसला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल पाण्यात बुडून (Death) मृत्यू झाला. ही घटना १८ मार्चला सायंकाळी उघडकीस आली. नागरिकांनी घटनास्थळी (Jalgaon) जात तरुणास पाण्यातून बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Breaking Marathi News)

Yawal News
Manmad Water Shortage : मनमाडकरांना पाणी टंचाईच्या झळा; वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात

यावल (Yawal) तालुक्यातील अंजाळे गावातील रहिवासी सुनील दिलीप बादशाह (वय ३०) हा तरुण १८ मार्चला सायंकाळी मोर नदीच्या पात्राजवळ गुरे चराईसाठी गेला होता. मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरकडे एक म्हैस गेली. त्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढत असताना सुनील याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. खोल पाण्यात पडल्याने त्याला बाहेर निघता न आल्याने तो बेपत्ता झाला. हा प्रकार सोबत असलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास आला असता त्याने गावात याबाबत माहिती दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yawal News
Gas Cylinder Blast : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरांचे नुकसान; कुटूंबाचा संसार उघड्यावर

यानंतर नागरिकांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने सुनील बादशाह याला पाण्यातून बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात भरत बादशहा यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सात महिन्याची मुलगी असा परिवार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com