Manmad Water Shortage : मनमाडकरांना पाणी टंचाईच्या झळा; वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात

Manmad News : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीत खोलवर पाणी पोहचले नाही. तसेच नद्यांना देखील पूर न आल्याने जमिनीतील पाण्याचे झरे कमी झाले आहेत.
Manmad Water Shortage
Manmad Water ShortageSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणी साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे (Manmad) शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरवासीयांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर वापरण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. (Tajya Batmya)

Manmad Water Shortage
Sangli News : चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी; खास बनविला आठ तोळ्याचा वस्तरा

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे जमिनीत खोलवर पाणी पोहचले नाही. तसेच नद्यांना देखील पूर न आल्याने जमिनीतील पाण्याचे झरे कमी झाले आहेत. शिवाय धरणात असलेल्या पाणी साठ्यात देखील घाट होत असून पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. यात मनमाड शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वागदर्डी धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्याने शहराला पाणी पुरवठा करणे आता शक्य होत नाही. महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा (Water Supply) केला जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manmad Water Shortage
Dengue Patients : धाराशिवच्या पांगरदरवाडीत डेंग्यूची साथ; महिनाभरात २५ रुग्ण पॉझिटिव्ह

दुसरीकडे भूगर्भातील पाणी खोल गेल्याने कुपनलिकांना पाणी कमी येऊ लागले आहे. तर काही कूपनलिका बंद पडल्या आहे. पाण्यासाठी नागरीकांना नगरपालिकेच्या सार्वजनिक नळांवर धाव घेण्याची वेळ आली असून ही परिस्थिती यापुढील काळात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पालखेड धरणातून लवकरात लवकर पाण्याचे आवर्तन न मिळाल्यास धरण कोरडे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पाणी टंचाईच्या झळा आता मनमाडकर नागरीकांना बसू लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com