बारावीच्या परीक्षेतील शेवटच्या जीवशास्त्राच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर कॉप्याच कॉप्या दिसून आल्या. खुद्द माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनीच फोटो दाखवत सामूहिक कॉपी कशी केली जात आहे आणि कॉप्यांचा पाऊस कसा पडला हे समोर आणले आहे. त्यामुळे यंदा मोठा गाजावाजा करीत कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे बोर्डाने सांगितलं असलं तरी बोर्ड त्यात पूर्णतः फेल ठरले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्राला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने शेवटच्या पेपरच्या दिवशी भेट दिली. हे पथक केंद्रावर पोहोचताच हॉलच्या खिडक्यांमधून कॉप्याचा पाऊस पडून खाली ढिगारा लागल्याचे दिसून आले. त्यात गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच होता.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह १७ पर्यवेक्षकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दुसरीकडे ओहर जटवाडा गावातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात पेपर देणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कॉपी प्रकरणामुळे सध्या जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
केंद्रातील परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. त्यानंतर कॉपी करण्यास मदत करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.