Chhatrapati Sambhajinagar Bus Station: बस स्थानकात भीतीदायक स्थिती; महिला प्रवाशांसाठी असुरक्षित

Chhatrapati Sambhajinagar Bus Station: पुण्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यातील बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बस स्थानकातील स्थिती कशी आहे बाबत साम टीव्हीने रिॲलिटी चेक केलाय.
Chhatrapati Sambhajinagar Bus Station
Chhatrapati Sambhajinagar Bus StationSaam Tv
Published On

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यातील बस स्थानकांमधील सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील अनेक बस स्थानकांमधील सुरक्षेचा बोजबारा उडालेला दिसत आहे. स्वारगेट बस स्थानकातील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर बस स्थानकांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

साम टीव्हीने राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बस स्थानकांची रिऑलिटी चेक केली. त्यात अनेक बस स्थानकांमध्ये भयानक स्थिती असल्याचं समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरामधील बस स्थानकातही भयाण स्थिती असल्याचं निदर्शनात आले आहे. बस स्थानकात प्रवाशांमध्येच दारूडे , भिकारी, गुन्हेगारी वृत्तीचे लोक बसलेली दिसत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Bus Station
Nashik Bus Station: पार्किंगमध्ये अंधार, अनलॉक बसेस; मध्यवर्ती आणि मेळा बसस्थानकात सुरक्षा रामभरोसे

माध्यम प्रतिनिधींना पाहिल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक दारूडे आणि भिकारी लोकांना बस स्थानकांच्या बाहेर काढू लागले. मात्र प्रवाशांच्या बसण्याच्या ठिकाणीच भिकारी आणि दारुडे लोक तेथे बसलेले असतात. तर काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक देखील बसलेले दिसतात. अशा परिस्थितीतून प्रवाशी लोक प्रवास करतात. बस स्थानक आणि आगारमध्ये असलेल्या अनेक बसेसचे दरवाजे हे उघडेच होते.

Chhatrapati Sambhajinagar Bus Station
Pune Swargate Bus Depot: अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई; स्वारगेट बस डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेतही शिवशाही बसचा दरवाजा हा उघडाच होता. संभाजीनगरातही असाच प्रकार समोर आलाय. येथेही अनेक बस लॉक नव्हते. रात्रीच्या वेळी स्थानकात पुरेसा प्रकाश नसतो. पार्किंग केलेल्या बसेसकडे लाईट नसल्याचं दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून बाहेर जाणे किंवा आत येण्याचा परिसरात लाइटिंग आहे. मात्र मागच्या बाजूला जिथे रात्रीच्या वेळेस बस थांबतात तिथे अंधारच अंधार आहे. त्यामुळे त्या परिसरात होण्या व्यक्तीला घेऊन गेले किंवा तिथे कोणी गुन्हेगारी वृत्तीचे लोक जमले हे कळणार ही नाही अशी स्थिती आहे.

Chhatrapati Sambhajinagar Bus Station
Pune Crime: गुंडगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा दणका; मारहाण केल्यानं गेली नोकरी

कोणत्याच प्रकारची चेकिंग सुरक्षा रक्षकाकडून केली जात नाही. मात्र माध्यम प्रतिनिधी पाहिल्यानंतर आणि कॅमेरा पाहिल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी आपण चेकिंग करत असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातील परिसर हा अंधार आणि निर्मनुष्य दिसला.त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकाच्या परिसरातच्या मागची बाजूला रात्रीच्या वेळेस जाणे भीतीदायक आहे.

बस स्थानक हे रात्रीच्या वेळेस महिला आणि प्रवाशासाठी असुरक्षित असल्याचे दिसून आलं. मात्र पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा दावा केला की आम्ही दररोज या ठिकाणी पहारा देत असतो. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. आम्ही सगळ्याच भागात फिरत असतो. बस स्थानकात भिकारी दारुडे आणि बस स्थानकाच्या मागच्या बाजूस अंधार आणि उघड्या बस असे चित्र दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com