नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून पोलिसांनी यातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून पोलिसांनी यातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे हि अल्पवयीन मतिमंद असल्याचे पुढे आले आहे.

माणुसकीला  काळिमा फासणारी हि घटना नागपुरात घडली असून दृश्यात दिसणारे हे नराधम रात्रीचा अंधार आणि मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत घेऊन गेले. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्या वर सामूहिक अत्याचार केला त्या नंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ आणून सोडले आणि पळून गेले.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले त्यानंतर पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचे बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्ड लाईनला दिले.

त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले त्या ठिकाणी ठेवले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईन ने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण सीताबर्डी पोलीस हद्दीतील असल्याने ते आरोपी आणि मुलीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आता सीताबर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आणखी कोणी दुष्कृत्यात सहभागी आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Ranji Trophy 2025: सर रवींद्र जाडेजा नाशिकच्या मैदानावर खेळणार, ऋतुराज काय रणनीती आखणार?

SCROLL FOR NEXT