Markadwadi ballot paper Voting : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात आज बॅलेटपेपरवर मतदान प्रक्रिया पाड पडणार आहे. सकाळी ८ ते ४ मतदान आणि ४ ते ५ मतमोजणी घेण्यात येणार आहे. मात्र भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६८ प्रमाणे काही ग्रामस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. गावात ५ डिसेंबरपंर्यत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत .
आज मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार आहे. ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची नोटीस प्राशासनाने दिलीय. गावातील प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी नोटीस दिली असली तरी चाचणी मतदान घेण्यावर गावकरी ठाम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर मारकडवाडी येथे पोहचले आहेत.
बॅलेटपेपरवर मतदान घेण्यास मारकडवाडी गावाला प्रशासनाने विरोध केलाय. गावात संचारबंदी लागू केली आहे. पण गावकरी मात्र मतदानावर ठाम असल्याचे समजतेय. बॅलेटसाठी बुलेट झेलू अशी पवित्रा गावकऱ्यांनी घेतली आहे. ईव्हीएम विरोधात आझ बॅलेट पेपरवर मतदान पार पडले तर हे देशातील पहिलं गाव ठरणार आहे.
प्रशासनाकडून बॅलेटपेपरवर मतदान घेण्यास विरोध दर्शवला आहे. गाव बेकायदा मतदान प्रक्रिया राबवत असल्याचं प्रशासनाने म्हटलेय. माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर गावात मुक्काम ठोकून आहेत. विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना या गावात १६० मतांची आघाडी मिळाली होती. त्यावरुन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा पुढे आला. मतदान सकाळी ८ ते ४ या वेळेत होणार आहे. तर मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात काय होत हे थोडाच वेळात कळणार आहे.
एकत्र येत गावाने त्यांचे खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर शासनाला आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल उत्तम जानकर यांनी केलाय. त्याशिवाय मारकडवाडी येथे मतदान होणारच असेही ते म्हणाले. प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाना सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.