Maharashtra Politics : महायुती सरकारचा शपथविधी कसा होणार, कोण कोण उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

Maharashtra Political News : महायुती सरकारच्या शपथविधीविषयी महत्वाची माहिती हाती आली आहे. हा कार्यक्रमाची रुपरेषेविषयी माहिती समोर आली आहे.
Maharashtra Election
Mahayuti Saam Digital
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : महायुती सरकराचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या शपधविधी सोहळ्यात महायुतीचे प्रमुख नेत्यांसह काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. या सोहळ्याला तब्बल ४० हजार जणांची उपस्थिती असणार असल्याची माहिती हाती आली आहे. नव्या सरकारचा शपथविधी कसा होणार आणि कोण कोण उपस्थित राहणार, याविषयी महत्वाची माहिती हाती आली आहे.

महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे महानियोजन करणे सुरु आहे. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी जगभरातील प्रमुख पाहूण्यांसह जवळपास ४० हजार जणांची उपस्थिती असणार आहे. महायुती सरकारचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.

Maharashtra Election
Mahayuti News : महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख, ठिकाण आणि वेळही ठरली; पण मुख्यमंत्री कोण होणार?

महायुतीला मत देणाऱ्या लाडक्या बहिणींना शपथविधीसाठी विशेष आमंत्रण देण्यात येण्यात आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय करण्यात आली आहे. १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे.

Maharashtra Election
Maharashtra Politics : ४ जणांना डच्चू, ४ जणांची वर्णी? शिंदेंच्या शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील येणार आहे. संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था केली जाणार आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आसन व्यवस्था वेगळी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com