Markwadi Voting: बॅलेट पेपरवर मतदानावरून प्रशासन आणि मारकडवाडीतील गावकरी आमनेसामने, जमावबंदीचे आदेश लागू

Markwadi Voting: माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला होता. मात्र प्रशासनाने येथे जमाव बंदी लागू केलीय.
Markwadi Voting Curfew
Markwadi Votingsaam tv
Published On

भरत नागणे, साम प्रतिनिधी

राज्यात महायुतीला अभूतपुर्व यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर संशय व्यक्त करायला सुरुवात केलीय. त्याचं लोण आता गावखेड्यापर्यंत पोहचलंय. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनीही ईव्हीएमवर संशय घेत बँलेट पेपर द्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आता प्रशासनाने बेकायदेशीर म्हणत २० जणआंना नोटीस बजावलीय. आज सोमवारपासून ते ५ डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत.

उद्या म्हणजेच ३ डिेसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार आहे. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची नोटीस प्राशासनाने दिलीय. गावातील प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलीय. पोलिसांनी नोटीस दिली असली तरी चाचणी मतदान घेण्यावर आम्ही ठाम आहोत अशी‌ भूमिका येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. परंतु प्रशासनाकडून तेथे जमावबंदी लागू करण्यात आलीय. दरम्यान गावातील सर्व गावकरी हे मतदान करण्यास तयार आहेत. यादिवशी फक्त मतदान होणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन मतदानासाठी सहकार्य करावे अशी विनंती शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केलीय.

निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आलीय. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.

मतदान का घेतलं जात आहे

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ ८४३ मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना १००३ मते मिळाली आहेत. यापूर्वी झालेल्या २००९, २०१४, २०१९ सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे ८० टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप गावकऱ्यांनी घेतलाय.

मारकडवाडी हे उत्तम जानकर यांच्या विचाराचं गाव असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. माळशिरसमधील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ३ डिसेंबरला सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर लगेचच मतमोजणीचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com