Marathwada Water Crisis Yandex
महाराष्ट्र

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत (Marathwada Water Crisis) आहेत. परिणामी दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. मराठवाड्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या वाढत गेली आहे. आता मे महिन्याच्या सुरुवातीला ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १२ लाख ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना पर्याय नाही.

टँकर वेळेत गेले नाहीत तर त्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती असं चित्र सध्या आहे. मराठवाड्यामध्ये सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे (Water Supply By Tanker) लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.

जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली होती. मार्च महिन्यात टँकरची संख्या ४३५ वर (Chhtrapati Sambhajinagar News) पोहोचली. तर एप्रिल महिन्यात मराठवाड्यात टँकरची संख्या १४२४ वर पोहोचली आहे. आता त्यात आणखी वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला पाण्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या ५६९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यात ४१८, परभणी जिल्ह्यात ५, नांदेड जिल्ह्यात १५, बीड जिल्ह्यात ३०२, लातूर जिल्ह्यात १३ तर धाराशिव जिल्ह्यात सध्या १०२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात (Chhtrapati Sambhajinagar Water Crisis) आहे. अनेक ठिकाणी खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरच्या किमती देखील वाढल्या असल्याचं दिसून येतं आहे. नागरिक हैराण झाल्याचं मराठवाड्याच चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT