पावसाने मराठवाड्यातील रस्ते आणि पुल गायब; दळणवळणाची गती मंदावली
पावसाने मराठवाड्यातील रस्ते आणि पुल गायब; दळणवळणाची गती मंदावली  Saam TV
महाराष्ट्र

पावसाने मराठवाड्यातील रस्ते आणि पुल गायब; दळणवळणाची गती मंदावली

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील रस्ते आणि पुलांची दाणदाण उडाली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील दळणवळणाची गती मंदावली आहे. अतिवृष्टीनंतर नद्या आणि ओढ्यावरील पाणी ओसरत असताना कुठे रस्ताच वाहून गेला आहे तर कुठे पुलंचगायब आहे, अशी स्थिती झाली आहे. कित्येक वर्षानंतर मराठवाड्यात एकाच महिन्यात तीन वेळा ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली. जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसतंय. नदी, नाले, ओढे पाण्यात बुडून गेलेत. आता हळूहळू पाणी ओसरत असताना रस्ते, पूल गायब झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. पुरात कोल्हापुरी बंधारे, पूल, रस्ते वाहून गेले. अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्यानं अनेक गावचे जाण्यायेण्याचे मार्गच बंद झाले आहेत.

मराठवाड्यात २७ आणि २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे २०१ पूल वाहून गेल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केला आहे. त्यात आता हळूहळू वाढ होत आहे. कारण पाणी ओसरल्यानंतर दिसू लागलंय. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील नदी आणि ओढ्याना पुर आल्याने सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीवरील पूल वाहून गेला. भराडी, उपळी परिसरात गाव, वाड्याला जोडणाऱ्या पूल आणि बिकट अवस्था झाली आहे. सावखेडा येथील फरशी पुल वाहून गेला आहे. कन्नड तालुक्यातील जवळपास बिकट अवस्था आहे. जळगाव घाट येथील रस्त्यावरील पाणी संपल्यानंतर असे दिसून आले की रस्ता वाहून गेलेला आहे.

सोयगाव तालुक्यातील घोसला, तिडका गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पैठण तालुक्यातील बालानगर, पाचोड, आडुळ जवळील अनेक, तांड्याना जाण्यासाठी रस्ता नाही. लासुर स्टेशन येथे जवळ असलेल्या शिवना नदी वरील महेबुबखेडा तालुका गंगापूर व शहाजपुर तालुका वैजापुर या ठिकाणचे बंधारे वाहून गेल्याने रस्ताही दिसेनासा झाला आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 61वरील दोन निर्माणधिन पूल या पावसाळ्यात दोन वेळेस वाहून गेल्यानं वाहतूक बंद आहे. सेलू तालुक्यातील कुपटा येथील गावाला जोडणारा पूल वाहून जात वाहतूक ठप्प आहे. पूर्णा तालुक्यात पूर्णा नांदेड रस्ता बंद आहे. जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा येथील तलावाचा साडवा फुटल्याने इटोली मांडवा परिसरातील रस्ता वाहून गेला आहे .

नांदेड जिल्ह्यातील 337 छोटे मोठ्या रस्त्यांचे तर 32 पुलांचे नुकसान झाले सुगाव, जाधववाडी, हनुमंतवाडी, सुनेगाव येथील तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टर पिकांची नासाडी झाली किनवट, माहुर, हदगाव, देगलूर, लोहा, कंधार या तालुक्यातीली रस्ते, पुलांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील सांडस सालेगाव तर हिंगोली तालुक्यातील समगा औंढा तालुक्यातील बेरूळा या गावानजीक पुल वाहून गेले आहेत. लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना जिल्ह्यातील अवस्था अतिशय बिकट झालीय. शेती पिकांची दाणादाण उडाली. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. रस्ते होत्याचे नव्हते झाले. काही ठिकाणी पुल वाहून गेले तर काही पुलांची मोठी पडझड झाली. त्यामुळे गावागावात जोडणारे रस्ते आता बंद झाले आहेत. आता हे रस्ते आणि पूल नव्याने उभारण्यासाठी आणि डागडुजीसाठी कोट्यवधीचा निधी मराठवाड्याला लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Tips: अख्खी रात्र पंखा वेगानं चालू ठेवून झोपणे अंगाशी येईल; दुष्परिणाम भयंकर

Pune News: धक्कादायक! फी न भरल्याने हजारो विद्यार्थ्यांचा निकाल रखडला; पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार

Nira Dam Water : लोकसभा निवडणुकीत नीरेचा पाणीप्रश्न पेटला!; पंढरपूरच्या 9 गावांतील शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा

Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT