मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराड

'लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा -कॉन्क्लेव्ह नागरी आणि जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत ते बोलत होते.
मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराड
मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराडSaam TV

पुणे : सर्वसामान्यांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत भारत देश विकसित होणार नाही. मोठ्यांना कर्ज दिले गेले पाहिजेच पण, त्याचबरोबर, लघुउद्योजकांसोबत भाजीपाला विक्री, किराणा दुकानदार अशा छोटे उद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळाले पाहिजे. देश समृद्ध होण्यासाठी सर्वसामान्य माणसांना कर्ज मिळवून देऊन त्यांचा विकास करण्याची गरज आहे,'' असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी येथे सांगितले.

'लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा -कॉन्क्लेव्ह नागरी आणि जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''मी अर्थ मंत्री झाल्यानंतर घडलेल्या महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. केंद्रातील सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे.

मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराड
अंबरनाथ पालिकेच्या डम्पिंगला नागरिकांचा तीव्र विरोध!

केंद्राने काही महत्वाचे निर्णय घेतले. 43 कोटी 40 लाख जनतेने जनधन अकाउंट काढले,'' "वेगवेगळे कृषिउद्योग सहकारी साखर कारखाने आजपर्यंत सात दशकांपर्यंत महाराष्ट्रात सहकार क्षेत्र खंबीरपणे उभे आहे. पब्लिक सेक्टर बँकापेक्षा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था लोकांना जवळच्या वाटतात. हा विश्वास आहे. सामाजिक आणि अर्थिक क्षेत्र सुधारण्याचे काम सहकारमधून योग्य पद्धतीने होऊ शकते.

सहकार क्षेत्रात काही ठिकाणी भ्रष्टाचाराची किडही लागली होती. परंतु जुन्या नेत्यांनी आणि लोकांनी चांगले काम करत ही भ्रष्टाचाराची कीड बाजूला करत चांगले काम केले आहे. आणि विश्वसार्हता जपली आहे," असेही ते म्हणाले. कर्जाची निकड असणाऱ्यांच्या अडचणींवर मार्ग काढणारे हे सहकार क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांची किंमत झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कशी चालते आणि कशी चालावी याबाबत 3 दिवसांत चर्चा चालणार आहे. यावर एक ड्राफ्ट तयार करुन काही तोडगा काढता येतो का यावर विचार होईल. देशाच्या आर्थिक व्यवस्थेत सुधार कसा करता येईल याबाबत या परिषदेत चर्चा होईल, असे सांगून ते म्हणाले, "महाराष्ट्र किंवा गुजरात मध्ये सहकार क्षेत्र चांगलं काम करत आहेत. या सहकार क्षेत्रातून अनेक बँका, वेगवेगळे प्रकल्प , साखर कारखाने राज्यात चांगल्या तऱ्हेने सर्व संस्था चालतात. वेगवेगळे कृषिउद्योग सहकारी साखर कारखाने आजपर्यंत सात दशकांपर्यंत महाराष्ट्रात सहकार क्षेत्र खंबीरपणे उभे आहे''.

मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराड
...तर काकडी गावचे ग्रामस्थ ठोकणार शिर्डी विमान तळाला कुलूप!

ते पुढे म्हणाले, "पब्लिक सेक्टर बँकापेक्षा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था लोकांना जवळच्या वाटतात. हा विश्वास आहे. सामाजिक आणि अर्थिक क्षेत्र सुधारण्याचे काम सहकारमधून योग्य पद्धतीने होऊ शकते. सहकार क्षेत्रात काही ठिकाणी भ्रष्टाचाराची कीडही लागली होती. परंतु जुन्या नेत्यांनी आणि लोकांनी चांगले काम करत ही भ्रष्टाचाराची कीड बाजूला करत चांगले काम केले आहे. आणि विश्वसार्हता जपली आहे''.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com