Manoj Jarange  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: कितीही उड्या मारल्या तरी मराठा समाज आरक्षणात येणारच, मनोज जरांगेंनी सरकारला खडसावलं

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरून त्यांनी राज्य सरकारला खडसावले आहे. कितीही उड्या मारल्या तरी मराठा समाज आरक्षणात येणारच, असं त्यांनी वक्तव्य केले.

Priya More

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. 'मराठा आरक्षणात आणल्याशिवाय राहणार नाही. आता मी माघार घेणार नाही.', असं त्यांनी सरकारला खडसावून सांगितले. 'जे जाती जातीत भांडणं करतात त्यांनाच फडणवीस मंत्री करतात.', असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांना देखील धारेवर धरलं. त्यांनी सांगितले की, 'भुजबळांनी कुठल्या ओबीसीचं चांगलं केलं. कुठला ओबीसी बांधव प्रशासनात आहे. ४५० जातीला काय मिळालं सांगा. हे फुकट नेतेगिरी करत आहेत. ओबीसी लोकांनी शहाणे व्हावे हे आपल्या आपल्यात दंगली भडकवत आहेत. ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत आम्ही काय खोट बोलत आहोत. आम्ही काय राजकारण केलं सांगा?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या "शिधा"वर देखील टीका केली आहे. 'मराठवाड्यावर अन्याय केला आहे. भुजबळ खोट बोलत आहेत. ५ कोटी मराठे आहेत असं सांगतात. त्यांनी कितीही विरोध केला कितीही उड्या मारल्या तरी मराठा आरक्षणात येणारच. मी माघारी येणार नाही. मी मुंबई सोडणार नाही. तिपटीने लोक आणणार हे माझ चॅलेंज आहे.', असा इशारा जरांगे पाटील यांनी भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांना दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरून देखील टीका केली. 'जे जाती जातीत भांडणं करतात त्यांनाच फडणवीस मंत्री करतात. जे जातीत दंगली करतात त्यांना मंत्री करतात. मराठ्यात आणि त्यांच्यात दंगली घडवण्याचा सरकारचा हेतू आहे. धनगर आणि आमचं काहीच नाही पण त्यांना पुढं केलंय. ७० टक्के मराठा लोकं ओबीसीमध्ये गेले आहेत. दंगल घडवायचा काम फडणवीस करत आहेत. दंगल घडवणार आणि दोष करण्याचे काम ते करत आहेत. भुजबळ यांना पुढं केलं आहे मला विरोध पत्करावा लागणार आहे. मराठा समाज अंगावर घ्यावा लागेल अशी भीती भुजबळ यांना वाटते त्यांनी हे बोलून दाखवलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

SCROLL FOR NEXT