Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर ५ आणि ६ जूनला अवजड वाहनांना बंदी, नेमकं कारण काय?

Mumbai-Goa Highway Traffic: रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर ५ आणि ६ जूनला अवजड वाहनांना बंदीचे आदेश जारी केले आहेत.
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर ५ आणि ६ जूनला अवजड वाहनांना बंदी, नेमकं कारण काय?
Mumbai-Goa HighwaySaam Tv
Published On

सचिन कदम, रायगड

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ५ आणि ६ जूनदरम्यान मुंबई -गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी वाहतुक बंदीचे आदेश जारी केले आहेत. रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्यासंख्येने येतात. यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पडावा, शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी बंदी जाहीर केली आहे. ५ आणि ६ जूनदरम्यान या महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर ५ आणि ६ जूनला अवजड वाहनांना बंदी, नेमकं कारण काय?
Raigad Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 1 ट्रक, 3 कार आणि ३ बसेस एकमेकांवर आदळल्या

५ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत या कालावधीमध्ये वाहतूक बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव - निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांकरिता बंदीचे आदेश लागू असणार आहेत.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर ५ आणि ६ जूनला अवजड वाहनांना बंदी, नेमकं कारण काय?
Raigad Politics: महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड, अजित पवार गटाचा नेता आमदारावर घसरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com