Manoj Jarange Patil: भाषण सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू

Manoj Jarange Patil Health: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमधील एका मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. याठिकाणी भाषण करत असताना शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Manoj Jarange Patil: भाषण सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू; आता प्रकृती कशी?
Manoj Jarange
Published On

योगेश काशिद, बीड

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडमध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान भाषण करत असताना अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Manoj Jarange Patil Health Update)

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे देखील नमुने घेण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी २४ तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. प्रकृती साथ देत नसल्याचे जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले होते. (Beed News In Marathi)

Manoj Jarange Patil: भाषण सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू; आता प्रकृती कशी?
Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना वाचवण्यसाठी छुपा अजेंडा, जरांगे पाटलांचा कुणावर निशाणा?

शुक्रवारी बीडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील भाषण देत होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर येऊ लागली. सुरूवातीला त्यांनी दुर्लक्ष केले आणि भाषण सुरूच ठेवले. चक्कर येत असल्याने ते खाली बसून भाषण देऊ लागले. पण नंतर त्यांना जास्त त्रास होऊ लागला आणि त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

Manoj Jarange Patil: भाषण सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू; आता प्रकृती कशी?
Manoj jarange: अशा टायमाला शिंदेसाहेब पाहिजे होते, त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com