Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal’s Ministerial Oath : थोड्याच वेळात छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन अजित पवार चूक करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्याशिवाय भुजबळांना मंत्रिपद देणं हा फडणवीस यांचा डाव असेल, मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?
भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली की नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. भुजबळ यांना मंत्रिपद देणे म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्याने भुजबळांना तात्पुरता आनंद आणि चॉकलेट देऊन नादी लावलं असेल, पण त्यांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल, असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवार यांच्यावर आरोप -
मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवरही गंभीर आरोप केले. अजित पवार जातीयवादी लोकांना पोसत आहेत आणि ही प्रचंड मोठी चूक आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा जरांगेंनी दिला. भुजबळांना मंत्रिपद देण्याचा डाव हा देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. मराठ्यांचे आरक्षण संपवण्याचा विडा फडणवीसांनी उचलला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांना प्रवाहात आणले, पण फडणवीसांनी शिंदेंनाही क्रॉस केले. काम झाल्यावर वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस, अशी घणाघाती टीका जरांगे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध करायला हवा होता
भुजबळ यांच्यावर जातीयवादी आहेत, अजित पवारांच्या सर्व आमदारांनी भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध करायला हवा होता, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी जरांगे यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचे संकेतही यावेळी दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.