Maharashtra Politics: फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे शिंदे? जरांगेंशी वाटाघाटीतून शिंदे दूर?

Sanjay Raut Allegation On Eknath Shinde Role In Maratha Agitation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाआडून एकनाथ शिंदेंना फडणवीस सरकार अस्थिर करायचं होतं, असा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केलाय? आणि याच कारणामुळे भाजपनं शिंदेंना वाटाघाटीपासून दूर ठेवलं का?
Sanjay Raut alleges Deputy CM Eknath Shinde tried to weaken Fadnavis government during Manoj Jarange protest; BJP sidelined Shinde in crucial negotiations.
Sanjay Raut alleges Deputy CM Eknath Shinde tried to weaken Fadnavis government during Manoj Jarange protest; BJP sidelined Shinde in crucial negotiations.Saam Tv
Published On

मनोज जरांगेंचं आंदोलनावर सरकारने यशस्वी तोडगा काढला... मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्यासाठी जरांगेंच्या आंदोलनाआडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रयत्न सुरु असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेसेनेनं केलाय..मात्र राऊतांचा आरोप मनोज जरांगेंनी फेटाळून लावलाय...

खरंतर मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले.. आणि मुंबईत चक्काजाम झाला.. त्याच काळात शिंदे दरेगावी निघून गेले.. त्यामुळे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीच शिंदेंची आंदोलकांना रसद असल्याचा आरोप राऊतांनी केला होता... तर राज ठाकरेंनीही जरांगेंचं वाशीतील आंदोलन मिटवणाऱ्या शिंदेंकडे बोट दाखवलं होतं.. त्यामुळे शिंदेंभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं.. नेमकं हिच वेळ भाजपनं साधली आणि विखे पाटलांबरोबर शिवेंद्रराजेंना आंदोलनाच्या वाटाघाटीसाठी पाठवलं... आणि जरांगेँशी जवळीक असणाऱ्या शिंदेंना भाजपनं दूर केल्याची चर्चा रंगली.

जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी विखेंवर जबाबदारी देण्यात आली.. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने विखेंनी बैठकांचा सपाटा लावला... एवढंच नाही तर जरांगेंशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानावर गेले. मात्र याआधी जरांगेंशी चर्चा करणाऱ्या उदय सामंत, प्रताप सरनाईक या शिंदेसेनेच्या मंत्र्यांना मागच्या रांगेत ठेऊन विखे पाटील आणि शिवेंद्रराजेंनी वाटाघाटी केल्या... त्यामुळे जरांगेंचं आंदोलन हाताळण्यासाठी शिंदेंची गरज नसल्याचा संदेश भाजपनं दिलाय..

मात्र महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा भाजपनं केलाय... असा दावा जरी करण्यात येत असला तरी ऐन आंदोलनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत का नव्हते...मराठा आरक्षणाचं श्रेय भाजपला मिळावं म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दूर ठेवलं गेलं की सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळाल्याने..... असा प्रश्न निर्माण झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com