Manoj Jarange Patil: आता माघारी यायचं नाही, पुढचं आमरण उपोषण मुंबईत; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. 'आता माघारी यायचं नाही, पुढचं आमरण उपोषण मुंबईत.', अशी घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Tv News
Published On

Maratha Reservation: 'आतापर्यंत संयमाने घेतली, पण सरकारने १०० टक्के आपली फसवणूक केली.', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. आता मुंबईत आमरण उपोषण होणार असे म्हणत मनोज जरांगेंनी तारीख देखील सांगितली. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'प्रथम सरकारचे कौतुक आहे. दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात. संयम तरी किती दिवस धरायचा.'

मनोज जरांगेंनी पुढच्या आंदोलनाची आज घोषणा केली. त्यांनी सांगितले की, '२९ ऑगस्ट २०२५ ला आम्ही मुंबईत जाणार आहोत. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या अगोदर कामं आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही.'

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: भाषण सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू

तसंच, 'सगे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील आंदोलनाची दिशा १ ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या पाठ झाल्या आहे. यावर सरकारची पीएचडी झाली आहे. शिंदे समितीने काम केलं. आमच्या नोंदी नाही म्हणले होते. तुम्ही त्या नोंदी शोधल्या त्यामुळे सरकारचे कौतुक केलं. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या. अधिकाऱ्याला काय अडचण आहे. अधिकाऱ्याला आमचा हक्क ना करण्याचा अधिकार काय आहे? जो अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नसेल त्याला तात्काळ निलंबित करून टाका.', अशी मागणी जरांगेंनी केली आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना वाचवण्यसाठी छुपा अजेंडा, जरांगे पाटलांचा कुणावर निशाणा?

मनोज जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'मराठा आणि कुणबी एकच आहे याचा अध्यादेश काढा. विद्यार्थ्यांनी नेत्यांचा ऐकून शिक्षणात जातीवाद आणू नका. आम्ही जातीवाद करत नाही. सरकारकडे मागणी आहे की सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या. माझ्यावर हल्ला करायचा. मला मारायचं आहे. आता मी दारात आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या. मी २९ ऑगस्टला तुमच्या दारात येत आहे तुम्हाला जे करायचं ते करा. मला फक्त २८ ला सोडायला पोर येतील २९ ला ते परत जातील. २८ ऑगस्टच्या आधी सगळ्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे. आमच्या संयमाचा अंत बघू नका फडणवीससाहेब.'

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : 'शत्रूपेक्षा मोठा धोका दिलाय; धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com