Maratha reservation protest Chhatrapati Sambhaji Nagar Pune, Nashik Ahmednagar ST bus services stopped Saam tv
महाराष्ट्र

ST Bus Service: मराठा आंदोलनाचा ST महामंडळाला धसका; अनेक ठिकाणी बससेवा ठप्प, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशाचे हाल

ST Bus Service: राज्यात ठिकठिकाणी बसची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे.

Satish Daud

Maharashtra ST Bus Service

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, ४० दिवस उलटून गेलेत, तरी देखील सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचललं नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडत आहेत. या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात ठिकठिकाणी बसची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक बससेवा ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहेत. (Latest Marathi News)

राज्यात कुठे-कुठे बससेवा बंद?

  • नाशिकमध्ये मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यात जाणाऱ्या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील स्मार्ट सिटी बस सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातून धावणाऱ्या अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाचे ५ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती आहे.

  • अकोला येथून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संभाजीनगर, पुणे, नांदेड, बीड, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

  • संभाजीनगर येथून नाशिकला जाणाऱ्या बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी बस, रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीचा प्रवाशांना आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे बससेवा कधी सुरळीत होणार याबाबत एसटी महामंडळ अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही.

  • बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बसची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे बीडमधील बससेवा बंद करण्यात आली आहे.

  • सोलापूर डेपोतून धावणाऱ्या लालपरीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

  • मराठा आंदोलनाचा फटका पुणे एसटी आगाराला बसला आहे. पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर येथे धावणाऱ्या लालपरीच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT