मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल राज्यात विविध ठिकाणी मराठा बांधवांकडून हिंसक आंदोलने करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जाऊन नये यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती कालच खालावल्याचं दिसत होतं. अन्न-पाण्याविना त्यांना अशक्तपणा आला होता. त्यांनी नीट उभं राहताही येत नव्हतं.
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनवरून जरांगे यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात तब्बल २४ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. थोड्या वेळात मराठा आरक्षणविषयक अभ्यासक यांना बोलवून त्यांचाशी चर्चा करुन पुन्हा मुख्यमंत्री यांच्याशी जरांगे बोलणार आहेत.
आरक्षण विषयावर गंभीरपणे चर्चा झाली आहे. मात्र मी अर्धवट आरक्षण घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती ते पत्रकार परिषदेत देणार आहेत.
मनोज जरांगे यांच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे सर्वच जण चिंतेत होते. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं सर्वच जण सांगत होते. त्यामुळे जनतेच्या मागणीवरून आता मनोज जरांगे पाटील पाणी पिऊन उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची काल भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिट चर्चा झाली. राज्यपाल लवकरच मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.