Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता; सरकारकडून हालचालींना वेग

Maratha Reservation news Update : अनेक राजकीय नेत्यांची घरे, कार्यलये जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation
cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservationSaam TV
Published On

Mumbai News :

मराठा आरक्षणचा प्रश्न लांबणीवर पडल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. बीड आणि इतर काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

अनेक राजकीय नेत्यांची घरे, कार्यलये जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मराठा आंदोलन आणखी चिघळू नये आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्री बैठकांचा धडाका

आज राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलनाबाबत मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो. (Latest Marathi News)

cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation
Maratha Reservation: सरकार ॲक्शन मोडवर; CM शिंदे जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांची घेणार बैठक; काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू?

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. आज सर्वपक्षीय बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री-राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची काल भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिट चर्चा झाली. राज्यपाल लवकरच मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट; CM शिंदे राज्यपालांच्या भेटीला

वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही बंद दाराआड चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली.

दरम्यान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही सागर बंगल्यावर दाखल झाले होते. पाऊण तासाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com