मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केही जात आहे. या आंदोलनाचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे राज्यातील आमदार-खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असताना आता काँग्रेसच्या आमदाराने देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे परभणीतील (Parbhani News) आमदार सुरेश वरपुडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वरपुडकर हे पाथरी मतदार संघातील आमदार आहेत.
राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहलं आहे. मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणासाठी (Maratha Aarakshan)मी विधान सभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, आपण माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी सर्वस्वी पाठींबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे.
तसेच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षांपासून त्यांचा लढा चालू आहे, त्याची दखल न घेता धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. धनगर समाजास उपेक्षित प्रवर्गातील आरक्षण जाहीर करावे.
त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवाना सुध्दा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या प्रवर्गात आरक्षणाची गरज आहे. ते आरक्षण मुस्लीम समाजास देण्यात यावे. वरील मागण्यांसाठी मी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं सुरेश वरपुडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.