Jalna News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी; दोन मुलं झाली पोरकी

Jalna Maratha Aarakshan News: जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
jalna News  30-year-old youth ended his life to demand Maratha reservation
jalna News 30-year-old youth ended his life to demand Maratha reservationSaam TV
Published On

Jalna Maratha Aarakshan News

जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्वपान बाबुराव कचरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

jalna News  30-year-old youth ended his life to demand Maratha reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट; CM शिंदे राज्यपालांच्या भेटीला

मिळालेल्या माहितीनुसार, स्वपान हा जालना तालुक्यातील (Jalna News) कचरेवाडी येथील रहिवासी होता. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तो आंदोलन करीत होता. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने स्वपान अस्वस्थ झाला होता.

मराठ्यांना आरक्षण (Maratha Aarakshan) मिळालं नाही, तर मी माझं जीवन संपवणार, असं स्वपान आपल्या काकांना सांगत होता. दरम्यान, आरक्षणाची मागणी करुन देखील सरकारकडून कोणतीही ठोस पाऊलं उचलली जात नसल्याने स्वपानला नैराश्य आलं.

याच नैराश्यातून त्याने टोकाची भूमिका घेत शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. स्वपानने आत्महत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच मराठा बांधवांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) स्वपानचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. स्वपान हा विवाहित असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे. मुलांच्या भवितव्यासाठीच स्वपानने हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Edited by - Satish Daud Patil

jalna News  30-year-old youth ended his life to demand Maratha reservation
Rashi Bhavishya: ऑक्टोबरच्या अखेरीस या राशींचं भाग्य उजळणार, सर्व मनोकामना पूर्ण होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com