मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीडच्या गेवराई शहरात घोंगडी बैठक पार पडली आहे. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, ''सरकारचे प्रतिनिधी अब्दुल सत्तार रात्री आले होते. आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यांनी खूप खोल हात घालण्याचा प्रयत्न केला, मी सत्तरांना म्हटलं, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जा आणि सांगा मराठ्यांना आरक्षण द्या.''
सरकारला आणि भाजपला (BJP) आव्हान देत जरांगे म्हणाले की, ''तुम्ही आरक्षण दिलं नाही, तर तुमचे 113 आमदार पाडणार. तुमच्याकडे सत्ता आहे आरक्षण द्या, नाहीतर मराठा सत्तेवर येणार.''
ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना (Farmers) सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अशी तशी नाही. ईपीक पाहणी वैगरे काही नाही. मी कृषिमंत्र्यांना फोन केला आणि म्हणालो, भाऊ मी तुम्हाला कधीच फोन करत नाही. शेतकऱ्यांना मदत करा, त्यावर ते म्हणाले, आपण सरसकट मदत देणार. आता तुम्ही शब्द दिला आहे. जर तुम्ही सरसकट दिलं नाही, तर गाठ माझ्याशी आहे.''
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. ते म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हला काय प्रश्न विचारता, तुम्ही सांगा आमच्या वैद्यता का थांबवल्या. तुम्ही एसीबीसीच्या आरक्षणाला 6 महिने मुदतवाढ दिली. मराठ्यांच्या आरक्षणाला का दिली नाही? पोलीस भरतीतील मुलं बाहेर काढली, आरोग्य विभाग, कृषी विभाग भर्तीमध्ये देखील तसेच केले. फडणवीस साहेब कोणतं आरक्षण तुम्ही मराठ्यांना दिलंय? आम्ही तुम्हाला विरोधक आणि शत्रू मानलं नाही.''
याच बैठकीत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ''आपण उमेदवार उभे करायचे म्हटलं की, भाजप खुश होतंय आणि नाही उभी करायची म्हटलं की, महाविकास आघाडी नाराज होते. हातोडा मारू पण योग्य वेळी मारू. दोघांचे गणिते चुकले पाहिजे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.