Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: मदत नको पण 'सदावर्तें'ना अटक करा, आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची मागणी

Maratha Reservation: आत्महत्येनंतर मराठा समाजाने अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गणेशच्या मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका असा संदेश लिहत संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगावच्या गणेश कुबेर यांनी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाने याप्रकरणी अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गणेशच्या मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

आम्हाला सरकारची दहा लाखाची मदत नको मात्र,सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा तेव्हाच आम्ही मृतदेहाला हात लावू,अशी आग्रही भूमिका गणेशचे आजोबा जनार्दन पाटील कुबेर यांनी घेतली आहे. गणेश कुबरे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रात्री साडे नऊ वाजता दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल व लेखी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे कुटुंबियांनी पोस्टमार्टम करण्यास विरोध दर्शविला.

गणेश कुबेर याने दुपारी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये, असा मजकूर स्वतःच्या हस्ताक्षरात पाटीवर लिहून आपले आयुष्य संपले होते. त्याला तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान आरक्षणासाठी मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू असताना अ‍ॅड. गुणवर्ते सदावर्ते यांनी मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही. त्यासाठी वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांच्या अटकेची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

SCROLL FOR NEXT