हर्षदा सोनोने
अकोला : उसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकार काही करत नाही. पण साखर कारखान्याला (Akola) भाव मिळाला पाहिजे; यासाठी प्रयत्न करते. म्हणजे हे सरकार मोठ्या लोकांचे आहे; असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला आहे. (Maharashtra News)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज अकोला दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला आहे. तर विधानपरिषदेत उमेदवार निवडून आणला होता. आता खासदार देखील निवडून आणू. यामुळे अकोल्याचा खासदार कॉंग्रेसचाच बनणार; असा ठाम विश्वास देखील पाटोलेंनी बोलून दाखविला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ललित पाटीलसोबत सरकारचे लागेबांधे
ड्रग्स माफिया ललित पाटील याला काही झालं नसताना त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलं. तिथं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. अश्या ड्रग्स माफियाला सरकार पाठीशी का घालते? असा सवाल पाटोलेंनी केला, सरकारचे लागेबांधे ललित पाटीलसोबत आहेत, असा आरोपही पाटोलेंनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.