Nandurbar Accident News: अवजड वाहनांचा तिहेरी अपघात; नेत्रंग- शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत

Nandurbar News : अवजड वाहनांचा तिहेरी अपघात; नेत्रंग- शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत
Nandurbar Accident News
Nandurbar Accident NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे  
नंदूरबार
 : नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नेत्रक- शेवाळे या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांचा विचित्र (Nandurbar) तिहेरी अपघात झाला आहे. महार्गाची अवस्था बिकट असल्याने हा अपघात (Accident) झाल्याचे सांगण्यात येत असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. (Live Marathi News)

Nandurbar Accident News
Sangli News : कृष्णा नदीची पातळी खालावली; पाण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन

नंदुरबार जिल्ह्यातून गेलेल्या नेत्रक- शेवाळे या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांची गाडी चालविताना मोठी कसरत होत असते. महामार्गावरील भले मोठे खड्डे वाचवण्याच्या नादात तीन अवजड वाहन एकमेकांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. चावरा हायस्कूल जवळ हा अपघात झाला असून अपघातामुळे एक ट्रक पलटी झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Accident News
Farmer Bullock Cart Yatra: आरक्षणासाठी शेतकरीही उतरले आंदोलनात; पंढरपूर ते अंतरवाली सराटी दरम्यान बैलगाडी आरक्षण यात्रा

वाहतूक झाली विस्कळीत 

तीन वाहनांच्या अपघातात सुदैवाने जीवितहानी ठरली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. या तिहेरी अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com