Maratha Reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या - मुधोजी राजे भोसले

Maratha Aarakshan : नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. त्यांना वेगळ्या प्रवर्गामधून आरक्षण द्या, असे म्हटले आहे.

Yash Shirke

  • मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, असे मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले.

  • ओबीसी आरक्षणाला विरोध करत मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षणाची त्यांनी मागणी केली आहे.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले असून राज्यातील वातावरण तापले आहे.

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो असे वक्तव्य देखील मुधोजी राजे भोसले यांनी केले आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे. त्यासाठी ओबीसीमधून आरक्षण देण्याचा काहीच गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मराठा आरक्षणावरुन राज्यात राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलनकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले. त्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन, चर्चगेट स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या आंदोलकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आमची सरकारचा एकच विनंती आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा, हैदराबाद गॅझिटीयर लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. आमच्या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मुंबई सोडून जाणार नाही, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Reform: आजपासून नवे दर! काय स्वस्त? काय महाग? वाचा संपूर्ण लिस्ट

पुण्यात मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे, पुणे विमानतळावर गुन्हा

Weekly Horoscope: 'या' राशींचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Bigg Boss 19 : "मैं तुमसे इश्क करने की इजाजत..."; तान्या मित्तलसाठी अमाल मलिकने गायले रोमँटिक गाणे, पाहा VIDEO

Sharadiya Navratri Celebrations: शारदीय नवरात्रोत्सवाला शुभारंभ! अंबाबाई मंदिरात पार पडली घटस्थापना|VIDEO

SCROLL FOR NEXT